महागाव तालुक्यातील पिंपळगाव ते पुसद रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (०३ ऑगस्ट) : पिंपळगाव ते पुसद रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरशः चाळणी झाली असुन यास्त्यावरून वाहन चालविणे तर अवघड पण पायी चालणे सुद्धा मुश्कील झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यारस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महागाव तालुक्यातील पिंपळगाव ते पुसद रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असुन याखड्डयांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडून वाहनधारक व नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत भविष्यात या खड्डयांमुळे प्रवाश्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तत्काळ या मार्गावरील खड्डे बुजवुन रस्त्याचे काम करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा मनसेच्या वतीने जि.प.बांधकाम उपविभाग महागाव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, शहराध्यक्ष संतोष जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनविसे तालुकाउपाध्यक्ष अमर चव्हाण, मनसे तालुकाउपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे महागाव शहराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, गुंज विभागअध्यक्ष सुनिल आव्हाड, गुंज विभाग सचिव प्रेमजीत जाधव, पिंपळगाव शाखाध्यक्ष पुरुषोत्तम पांगरकर, पवन जाधव, अंगद कदम यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
महागाव तालुक्यातील पिंपळगाव ते पुसद रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य महागाव तालुक्यातील पिंपळगाव ते पुसद रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य Reviewed by सह्याद्री चौफेर on August 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.