सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
जिवती, (२६ ऑगस्ट) : तालुक्यातील आंबेझरी येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत ईमारत व वाचनालय इमारतीचे लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सभापती सौ गोदावरी केंद्रे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत भवनाकरिता जनसुविधा योजने अंतर्गत सन 2019 - 20 मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की, ग्रामपंचायतची ईमारत ही समस्या नाही तर गावातील समाधान करण्याचे माध्यम व्हावे. ग्रामपंचायत ही गावातील प्रमुख गरजेचे कार्यालय आहे. इथे येणारा प्रत्येक नागरिक कोणत्याही कामानिमित्त येते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळणारे दाखले,जन्मापासून ते मृत्यू प्रयत या कार्यालयात सर्व माहिती उपलब्ध असते, आंबेझरी गावाकरिता माझ्या कार्यकाळात अनेक विकास कामे मार्गी लागले आहे. तसेच जिवती तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीला रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, आरोग्य करिता निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या काळात आंबेझरी गावासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्यासह कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सभापती सौ.अंजनाताई पवार हे तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद माजी सभापती सौ. गोदावरी केंद्रे, गट विकास अधिकारी आस्कर साहेब, भाजपचे तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, उपसरपंच भीमराव पवार, ज्ञानोबा येलकेवड, बालाजी भुते, देवगडे साहेब, माधव नेवळे, संजय पवार, बोरूळे सर, जांभुळकर सर तथा गावातील जेष्ठ नागरिक व इतर मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतची ईमारत समस्या नाही तर,समाधान करण्याचे माध्यम व्हावे - माजी आमदार ॲड.संजय धोटे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 26, 2021
Rating:
