टॉप बातम्या

ग्रामसेवक दाखवत आहे गट विकास अधिकाऱ्यांना केराची टोपली तर अभियंता मोका पाहणी करण्यास करत आहे विलंब


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमावर 
केळापूर, (२६ ऑगस्ट) : वांजरी येथील शेतकरी राजू रामलू गुडेवार यांना बुजलेली विहीर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१८-२०१९ मध्ये मंजूर झाली. परंतु कामाला मंजूरी मिळून ही काम पूर्ण झाले नाहीत असे शेतकऱ्याने लेखीत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले.

विहिर दुरुस्त न करता त्या विहिरीच्या दुरुस्तीकरणाची रक्कम उचलल्याचे धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याबाबत शेतकऱ्याने पंचायत समिती कडे तक्रार केली. गट विकास अधिकारी यांनी दिनांक २८-७-२०२१ ला ग्रामसेवकांना लेखी नोटीस देऊन मोजपुस्तिका व फाईल सादर करायला पाच दिवसाची कालावधी दिली. परंतु पाच दिवस उलटून गेली, अजूनपर्यंत ग्रामसेवकाने पंचायत समिती कार्यालयात कागदपत्रे सादर केली नसल्याने तो अधिकाऱ्यांना केराची टोपली दाखवत आहे. असे असताना ग्रामसेवकांवर गट विकास अधिकाऱ्यांनी अजून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बुजलेल्या विहिरीचे दुरुस्तीकरण न करता परस्पर रक्कम उचलून भ्रष्टाचार केल्याचे उघड असताना त्या भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा घाट तर घातला जात नाही ना? त्यामुळे शेतकऱ्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन तक्रार दाखल केली. यावरून चोवीस तासाच्या आत मोका पाहणी करावी असा आदेश गट विकास अधिकारी यांनी दिला. परंतु अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता पांढरकवडा अभियंताही पाहणी करण्यास विलंब करीत आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणात कोणीच लक्ष का?देत नाहीत, ह्या  भ्रष्टाचारात कोण कोण हात ओले केले आहे, ग्रामसेवक, अभियंता, ठेकेदार, की वरिष्ठ अधिकारी, कोणी भ्रष्टाचार केला. हे योग्य कार्यवाही केल्यानंतरच समोर येईल..तूर्तास विहीर दुरुस्तीकरणामधील भ्रष्टाचारांवर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
Previous Post Next Post