रानडुकराच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट!


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
पुसद, (०४ ऑगस्ट) : तालुक्यातील भंडारी या गावचे शेतकरी देविदास ज्योतीराम राठोड हे आपल्या शेतात जात असतांना त्यांचेवर रानडुक्कराने हल्ला केला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजपा किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख महेश नाईक यांनी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्व्जीत सरनाईक, कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब उखळकर यांचे सह मयत राठोड परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे कुटुंबीय शांतिबाई देवीसींग राठोड व कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी वन विभागाकडून दिल्याजाणाऱ्या तात्काळ मदतीची माहिती जाणून घेतली. पण या घटनेस १२ दिवस लोटूनही राठोड परिवाराला वन विभागाकडून मदत पोहचली नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा महेश नाईक यांनी वन विभाग मारवाडी रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल झाबरे व वन पाल नाना मस्के यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून मदतीबाबत चर्चा केली. या कुटुंबास तात्काळ मदत म्हणून द्याव्याचा ५ लाखाचा धनादेश त्वरित देऊन उर्वरित १० लाख ची फिक्स डेपोसिट बाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या. या नंतर होणारी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही महेश नाईक यांनी वन विभागाला दिला.यावेळी उपस्थिती गावकर्यांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या व त्यांना याबाबत सर्वतोपरी मदत करण्यासंबंधी अश्वस्त केले. नवीन जींआर प्रमाणे, स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेचाही लाभ या कुटुंबियांना देता येईल का, हे तपासून पाहाण्याचं सूचना ही त्यांनी भाजपचे प्रशांत काळे यांना दिल्या.

यावेळी विश्व्जीत सरनाईक, बाळासाहेब उखळकर, दीपक गडदे, प्रशांत काळे रांजना, सुरेश देवराव पाटील,(पो. पाटील,भंडारी), जगदीश सुकाराम पवार,रामचंद्र नेमीचंद पवार, शंकर बीबीचंद राठोड, देविदास दगडू पवार, प्रकाश दगडू पवार, विनोद उत्तम पवार, संतोष नामदेव राठोड, बळीराम केवळा पवार आदी भंडारीतील गावकरी उपस्थित होते.
रानडुकराच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट! रानडुकराच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.