तक्रारीची घेतली दखल : आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांसह पोट हिस्सेदारांवर गुन्हे दाखल


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०४ ऑगस्ट) : तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी देवराव लटारी फरताडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव येथील दोषीं कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली होती.

या मागणीला यश आले असून, संबंधित भुमपकासह आणखीन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा कार्यवाही करण्यात आली. मृतकच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली भुमापक कोमल तुमस्कर, (३७), राजू नामदेव ऐकरे ((४०), व वासुदेव एकरे (७०) असे आरोपीचे नावं असून, यातील दोन हे शेतीचे हिस्सेदार आहेत. 

काय प्रकरण आहेत ते पहा:

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी श्री. देवराव लक्ष्मण फरताडे यांनी मौजा हिवरा येथील तीन एकर खरेदी केलेल्या शेतीची चुकीच्या पद्धतीने मोजणी शीट तयार केल्याचा मनस्ताप सहन न झाल्यामुळे हटवांजरी येथील शेतकऱ्याने दुर्दैवी आत्महत्या घडली.
देवराव फरताडे यांची चुकीच्या पद्धतीने मोजणी शीट तयार झाल्याने त्यांनी सुधारणेसाठी भूमिअभिलेख कार्यालयात वारंवार येरझारा घातल्या, परंतु 
त्यांच्या मागणीला कुठलीही दखल भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी भूमी अभिलेखच्या कारभाराला वैतागून दिनांक २७ जुलै ला विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केले होती.

भूमी अभिलेख चा घोळ :

सात बारा तयार करण्यात आला. मात्र, शेत मोजणी शीटमध्ये घोळ केल्याने ते नेहमी तणावात असायचे, वारंवार भूमिअभिलेख ला चकरा मारून त्यांना न्याय मागत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नसल्याने शेवटी आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवावा लागला. मारेगाव भूमी अभिलेख चा घोळच शेतकऱ्याच्या जिव्हारी आला. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भूमी अभिलेखेतील गलथान कारभारावर कारवाई करा असा आरोप मृतकाच्या पत्नीने केला होता.

स्थानिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांची भेटी :

किशोर तिवारी यांच्या भेटी पाठोपाठ स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने पाठिंबा देत काल तहसीलदार व मारेगाव ठाणेदार मंडलवार यांना निवेदनातून दोषींना निलंबित करा व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वराज्य शेतकरी युवा संघटना यांनी करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी केली होती,
अन्यथा स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला होता.

स्थानिक सामाजिक पाठबळाची भूमिका महत्वाची :

मृताकाच्या पत्नीला स्थानिक पाठबळ मिळताच मृतकाची पत्नी मनीषा फरताडे यांनी पोट हिस्सेदार व भूमी अभिलेखातील कर्मचाऱ्यांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दिली. अखेर या प्रकरणी मंगळवारी दि.०३ ऑगस्टला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भांदवी कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
तक्रारीची घेतली दखल : आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांसह पोट हिस्सेदारांवर गुन्हे दाखल तक्रारीची घेतली दखल : आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांसह पोट हिस्सेदारांवर गुन्हे दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.