सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०४ ऑगस्ट) : एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिस ए ऐतेहादुल मुस्लिमीन) च्या वणी युवा शहर अध्यक्षपदी येथील शादाब अहेमद यांची तर शहर अध्यक्षपदी मो. आसीम हुसैन यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादचे खासदार व एआयएमआयएम चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार त्यांची ही निवड करण्यात आली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या निवड सभेत एआयएमआयएम चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी व महाराष्ट्र प्रदेश सचिव फिरोज लाला प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते शादाब अहमद व मो. आसीम हुसैन यांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेचे कार्य वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेची योग्यरीत्या वाटचाल सुरु ठेवावी अशा उपस्थितांमधून मनोकामना व्यक्त केल्या.
एआयएमआयएम च्या वणी युवा शहर अध्यक्षपदी शादाब अहमद यांची निवड
Sahyadri chaufer