सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (०५ ऑगस्ट) : सध्या जगभरामध्ये कोरोना संकटाने लोक हैराण झाले असून, मनोबल खचले आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांचे आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र या उपयोजनेचा तिनतेरा करून संबंधित प्रशासन व त्यांचे मर्जीतील दलाल हे महत्वाचे उपलब्ध इंजेक्शन, टॅबलेट यावर तिरडी नजर ठेवून बसलेत. त्यात काही संबंधित अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेले दलाल या रेमडीसीव्हर इंजेक्शनचा व टॅबलेटचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्ते दीपक थोरात यांनी केला आहे.
सर्वसामान्य जनतेला या कठीण काळात वेळीच उपचार मिळावा म्हणून वेळोवेळी कोविड संबधी इंजेकशन टॅबलेटचा काळाबाजार झाल्याने या काळाबाजारात जिल्हा रुग्णालयातील संबंधित लोकांची चलती तत्कालीन बीड शल्य चिकित्सक यांच्या कार्यकाळात झाला. अशा संबंधित लोकावर तात्काळ एफआयआर दाखल करावा यासाठी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत या संबंधित लोकांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी उपोषण सुरु राहणार असे सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सांगितले. त्यामुळे आता या सर्व बाबीवर बीड जिल्हा पोलिस अधिक्षक काय कारवाई करतील याकडे सर्व बिडकरांचे लक्ष लागले आहे.
कोविड काळात काळा बाजार करणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करा - दिपक थोरात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 05, 2021
Rating:
