मानव विकास 'बस फेरी' चालू नसल्याने विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित

                         (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२६ जुलै) : महागांव माजी पं. स. सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष  संदीप पाटील ठाकरे यांना वरोडी, कासारबेहळ, सेवानगर, अनंतवाडी व इजणी येथील पालकांनी भेट घेतली असता, इयत्ता आठवी नववी व दहावी चे शासनाने वर्ग चालू केले. परंतु चालू वर्गाला जाण्यासाठी विद्यार्थीना बस सेवा नसल्याने त्यांना सात ते आठ किमी अंतरावर पायदळ रस्ता तुडवत जावं लागतात असे भेटी दरम्यान त्यांनी सांगितले.

मुलींना पायदळ जात असतांना चिडिमारी चा व रोडरोमिंयोचा सामना करावा लागतो. या दरम्यान निर्भया सारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा पालक वर्गातून सुर उमटत आहेत. श्रीमंत पालकांच्या मुली स्व:खर्चाने किंबहुना स्वतः च्या गाडीने शाळेत जात आहे, परंतु ज्यांचे हातावर आणून पोट भरणाऱ्यांच्या मुलींचे भवितव्य काय? या संदर्भात माजी पं.स. सदस्य संदीप ठाकरे यांना सर्कल मधील जनतेनी तसेच पालकांनी घेराव घातला असता, त्यांनी प्रश्नावर उद्या होणाऱ्या पंचायत समितीच्या सभागृहत सौ. स्नेहा संदीप ठाकरे पं.स. सदस्य महागांव यांच्या मार्फत मानव विकास बस फेरीचा मुद्दा हा मांडण्यात येत आहे. मी स्वतः या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उमरखेड डेपो मॅनेजर यांच्याकडे मानव विकास बस सेवा सुरु करण्याची मागणी घालणार असून, उमरखेड ते ढानकी फुलसंगी कासरबेहळ मार्गे माहूर ते यवतमाळ बस लवकरच चालू करू असे ही त्यांनी 
सांगितले.

यावेळी साईबाबा विदयालय टेंभी येथे शिक्षण घेत असणाऱ्या महागाव तालुक्यातील अनेक मुली मानव विकास बस फेरी अभावी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. मात्र, येथील स्थानिक आमदार यांचे महागाव- उमरखेड विधानसभा क्षेत्र असून, त्यात महागांव तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशी जनसामान्यातून ओरड होत आहे.
मानव विकास 'बस फेरी' चालू नसल्याने विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित मानव विकास 'बस फेरी' चालू नसल्याने विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित  Reviewed by सह्याद्री चौफेर on July 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.