माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमीत्त किनवट येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (२६ जुलै) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवस निमीत्त किनवट येथे आज रोजी सकाळी ११:०० वाजता आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतिक केराम व तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
       
सध्या भारतामध्ये कोरोना प्रमाण कमी झाले नाही या व इतर सामाजिक बाबीला अनुषंगून यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस किनवट साजरा करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्ष लावण्यात आले. तर किनवट येथील गोकुंदा स्थित उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.  
या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाबूराव केंद्रे, अनु.जमाती जिल्हाध्यक्ष गोविंदा अंकुरवाड, अनु.जमाती भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, जितेंन्द्र कुलसंगे, दत्तभाऊ आडे, पं.स उपसभापती कपिल करेवाड, तालुका समन्वयक बाळकृष्ण कदम, संतोष मरसकोल्हे, नगरसेवक शिवाजी आंधळे, नरेंद्र सिरमनवार, विवेक केंद्रे, लक्ष्मन मुंजे, संतोष कन्नाके, इंद्रदिप वाघमारे, नरसिंग तक्कलवार, आकाश भंडारे, राजू दराडे आदी उपस्थित होते.


माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमीत्त किनवट येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमीत्त किनवट येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on July 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.