विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बेमुदत बंद ठिय्या आंदोलन
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
केळापूर, (२६ जुलै) : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ९ ऑगस्टला क्रांतिदिनींपासून विदर्भ चंडिका मंदिर, इतवारी चौक, नागपूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यातील १२० तालुक्यात जिल्हा व तालुका कार्यकारिणीची बैठक व सभा होत आहे.आज दि. २६ जुलै सोमवार रोजी जगदंबा देवी संस्थान, केळापूर येथील सभागृहात विदर्भ आंदोलनाचे नेते व माजी आमदार एड. वामनराव चटप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली.
या सभेला माजी आमदार एड. वामनराव चटप साहेब, यवतमाळ जिल्हा (पूर्व) अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील, यवतमाळ जिल्हा (मध्य) अध्यक्ष श्री. कृष्णराव भोंगाडे, पश्चिम विदर्भ, युवा आघाडी अध्यक्ष श्री. प्रदीप धामणकर, पांढरकवडा तालुका समन्वयक श्री. गोविंदराव चिंतावार, यवतमाळ जिल्हा (पूर्व) युवा आघाडी अध्यक्ष श्री. राहुल खारकर, पांढरकवडा तालुका अध्यक्ष एड. किष्टन्ना मुत्यलवार ई. मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी समितीचे पदाधिकारी व विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बेमुदत बंद ठिय्या आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2021
Rating:
