सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (२६ जुलै) : सगरोळी ता बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते व निजामाबाद समाचारचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शंकर पवारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व पक्ष्याच्या निष्ठेवरून बहुजन फ्रंट ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज चौधरी यांनी शंकर पवारे सगरोळीकर यांची बहुजन फ्रंट ऑफ इंडिया या राजकीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नुकतेच पक्ष्याच्या बैठकीत नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली.
या निवडीबद्दल विजयकुमार सोनकांबळे, प्रकाश फुगारे, यादव लोकडे, देविदास कोंड्लाडे, मुर्तुजा शेख, संतोष कल्लेवार, वैभव घाटे, ए जी कुरेशी, सय्यद रियाज यांच्यासह सर्व क्षेत्रातून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
बहुजन फ्रंट ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी शंकर पवारे यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2021
Rating:
