टॉप बातम्या

चिटमोगरा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे पूल गेला वाहुन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (२६ जुलै) : बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील मुख्य रस्त्याचे पूल सतत च्या पावसामुळे वाहून गेले.
चिटमोगरा या गावातील मुख्य रस्ता देगलूर नर्सी मेन रोडला जोडला जाणारा रस्ता सततच्या मुसळधार पावसामुळे रस्तावरचा पूल वाहुन गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुढे जाण्यास मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, या तुटलेल्या निकृष्ट पूलाबद्दल माहिती मिळताच माननीय माजी अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे साहेब व कमलादेवी सेवा फाउंडेशन अध्यक्ष सौ. वंदना बाबुराव कांबळे यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तात्काळ पूल  बांधकाम करण्याचे सुचना दिल्या.

 यावेळी सरपंच आकाश दिगांबर कोकणे, उपसरपंच शिवराज जळबा शेळके, दिलीप लक्ष्मण डोईवाड, भगवान विठ्ठलराव पाटील, पोलीस पाटील मोहनराव पाटील पेंडलवाड, यशवंत झरीबा भेदेकर गावा तील मंडळी उपस्थित होते.


Previous Post Next Post