सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : स्थानिक जैताई मंदिर परिसरातील रहिवासी प्रवीणभाई जयरामभाई ठक्कर (८३) यांचे रविवारी रात्री 11.30च्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाले.
महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागातून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार चंद्रपूर मेडिकल कॉलेजला त्यांचे देहदान करण्यात आले. दीड वर्षांपूर्वीच त्यांच्या दीपेश नामक ज्येष्ठ मुलाचे अकाली निधन झाले होते.
ठक्कर परिवारावर हा दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी वासंतीबाई मुलगा मनीष, सुना, नातवंडं असा बराच आप्त परिवार आहे.