सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२६ जुलै) : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधील सद्दाम शेख यांच्या घरासमोर सततधार पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असून अशी स्थिती चिमणाजी नगर मध्ये सुद्धा आहे.
शहरातील एकूण सतरा प्रभाग आहेत. त्यापैकी अनेक प्रभागात नाल्या नाही रस्ते नाही त्यामुळे अनेकांच्या घरचे सांडपाणी रस्त्यावर येतात तर पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होतात त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या एक आठवड्यापासून सताधर पाऊस सुरू असल्याने रस्ते चिखलमय झाले आहे.
नगरपंचायत मधील सत्ताधार्यांची मनमानीचे राजकारण महागाव वासियांच्या जीवावर ऊठले आहे. स्वच्छता, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, नाल्या सफाईकडे दुर्लक्षाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सार्वजिनक मुतारी असे अनेक प्रश्न शहरवासियांना भेडसावत आहे. मात्र सत्ता एकदा मिळाली की अर्थाजन एकमेव धर्म असे अघोषित धोरण अवलंबत कारभार सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे .
पावसाळ्यात अनवाणी पायाने चालता ही सुद्धा येत नसलेल्या प्रभाग क्रमांक १७ मधील चिखलमय रस्त्यावर अनेक जण पडले येथील ग्रामस्थांना जीवनाश्यक वस्तूंसाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे.
"चिमनाजीनगर प्रभाग क्रमांक १७ मधिल कावळे यांच्या घरा पासून ते जाधव यांच्या घरापर्यंत कच्च्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो. संपूर्ण चिखल तुडवत येथून नागरीकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्रामस्थांना रस्त्याची सोय करावी."
- गजानन पाटील,सामाजिक कार्यकर्ते
महागांव : चिमणाजीनगर मध्ये चिखलाचे साम्राज्य
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2021
Rating:
