टॉप बातम्या

मुलगी झाली म्हणून जिंवत जाळले: नंनद-पतीने घेतला बाळतीन महिलेचा जीव, दातपाडी येथील घटना


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
पांढरकवडा, (१८ जुलै) : केळापूर तालुक्यातील दातपाडी येथील एका विवाहित महिलेला तेल ओतून जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला असून, या दुर्दैवी घटनेत विवाहितेचा बळी गेला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलीस सूत्रानुसार मृतक मोनिका गणेश पवार हिने दि.४ जुलै रोजी एका गोडस मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म का?दिला या कारणावरून तिची नंनद कांता संजय राठोड हिने कडाक्याचा आधी वाद घातला होता. त्यानंतर मृतक महिला हि बाळंतपण असल्याने भांडणाकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्या नंतर काही वेळानी  मृतक मोनिका ही बाथरूम ला गेली असता, नंनद कांता हिने मृतका च्या अंगावर ऑईल टाकुन पेठवून दिले. त्यात मृतक मोनिका ही ८० टक्के जळली. दरम्यान, जळालेल्या मोनिका ला उशीरा उपचारसाठी सेवाग्राम येथील दवाखाण्यात नेण्यात आले. मात्र, दि. १७ जुलै च्या रात्री तीने अखरेचा श्वास घेतला.

मोनिकाच्या पश्चात एक चार वर्षाचा मुलगा असून, नुकतीच १४ दिवसाची मुलगी सुद्धा आहेत. सदर घटनेचा पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चापाईतकर व सहकारी करीत आहे.











उपचारा दरम्यानमहिलेचा मृत्यू झाला. मोनिका गणेश पवार असे मृत महिलेचे नाव आहे. तिला फक्त बारा दिवसाची मुलगी आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नणंद कांता राठोड हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे
Previous Post Next Post