आज महागावात होणाऱ्या 'शिव संपर्क अभियान' उपस्थित राहण्याचे आवाहन

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (१९ जुलै) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हिवरा जि.प. गटातील सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक बंधू आणि भगिनींना शिवसंपर्क मोहिमेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानाचा उद्या दिनांक १९ जुलै २०२१ रोज सोमवार पासून एकवीरा देवी सवस्थान सकाळी १० वाजता पासून सुरवात होणार आहे या शिवसंपर्क अभियानाचा निमीत्ताने शाखाप्रमुख व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मा.परागभाऊ पिंगळे शिवसेना जिल्हा प्रमुख, मा. दिलीप भैया घुगे युवासेना विस्तारक यवतमाळ, मा. चितंगराव कदम सहसंपर्कप्रमुख, मा.बळीरामजी मुटकुळे उप जिल्हाप्रमुख, मा. रामरावजी पाटील नरवाडे शिवसेना जेष्ठ नेते मा. डॉ. बी. एन चव्हाण जी.प. सदस्य, मा. डॉ. विश्वनाथ विणकरे उमरखेड विधान सभा संघटक, मा. राजेश खामनेकर उप जिल्हा संघटक, मा. प्रमोद भरवाडे तालुका प्रमुख, मा.सै.निर्मलाताई विनकरे शिवसेना महिला जिल्हा संघटीका, मा. सुदामजी खंदारे, मा. उप. जिल्हा प्रमुख विशाल पांडे, युवासेना जिल्हा प्रमुख रवींद्र भारती, शिवसेना तालुका संघटक राम तंबाखे, सभापती सौ. लक्ष्मीताई पारवेकर महिला आघाडी उप जिल्हा संघटीका, दतराव कदम जेष्ठ शिवसैनिक, राजू राठोड शहर प्रमुख महागाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. तरी या अभियानाला सर्व शिवसैनिकानी उपस्थित रहावे. असे श्री. अशोकराव तुमवार (शिवसेना उप तालुका प्रमुख), श्री. राजुभाऊ धोतरकर (विभाग प्रमुख हिवरा) आवाहन केले आहे.

आज महागावात होणाऱ्या 'शिव संपर्क अभियान' उपस्थित राहण्याचे आवाहन आज महागावात होणाऱ्या 'शिव संपर्क अभियान' उपस्थित राहण्याचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.