आर्णी पोलिसांनी केला 'गावठी हातभट्टी' चा साठा उध्वस्त

 
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
आर्णी, (१९ जुलै) : तालुक्यातील येरमल हेटी या शेत शिवारात मधुकर राठोड यांच्या शेता पलिकडील नाल्यामध्ये आरोपी नामे प्रेम सिंग कपुरचंद राठोड (४२) रा. येरमल हेटी हा नाल्यामध्ये गावठी हात भट्टी दारू भट्टी लावून काढताना आढळून आला. त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप मसराम,पोलिस जमादार सतीश चौधार व मदतनीस विकास खंदारे, नफिसा शेख यांनी त्यांच्यावर धाड टाकली असता, तो त्या ठिकाणावरून पोलिसांना पाहून पळून गेला. त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या झाडाझुडुपांमध्ये व नाल्यामध्ये पाहणी केली असता चार निळ्या रंगाच्या ड्रम मध्ये प्रत्येकी ६० लिटर असा एकूण २४० लिटर मोहा माच व साहित्य असा एकूण २६००० (सव्वीस हजार रुपयाचा) माल अवैधरित्या मिळून आला वरून नमूद इसमावर कलम ६५ फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून फरार आरोपी चा शोध आर्णी पोलीस घेत आहे.
सदर कारवाई मा. ठाणेदार पितांबर जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मा.दिलीप मसराम व पोलिस जमादार सतीश चौधार, तसेच पोलिस शिपाई विकास खंदारे, नफिसा शेख यांनी केली.
आर्णी पोलिसांनी केला 'गावठी हातभट्टी' चा साठा उध्वस्त आर्णी पोलिसांनी केला 'गावठी हातभट्टी' चा साठा उध्वस्त Reviewed by सह्याद्री चौफेर on July 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.