टॉप बातम्या

शिवसंपर्क मोहिमेत गोदी (अंबड) येथील शिवसैनिकांशी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांचा संवाद

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (१९ जुलै) : 
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जिल्हा जालना, अंबड तालुक्यातील गोदी या गावातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखा प्रमुख नियुक्त्या, बुथ रचना ,बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेण्यात आला.

यावेळी मा हिकमत दादा उडान (सहसंपर्क प्रमुख)
ए जे बोराडे (जिल्हाप्रमुख) ,लक्ष्मण वडजे (उपनेते) ,
पंकज आप्पा सोनपेठ (तालुका प्रमुख अंबड),
 उद्धव मरकड (तालुका प्रमुख घनसावंगी),
 अभिमन्यू कापरे (उपतालुका प्रमुख),
 विभाग प्रमुख रामचंद्र गव्हाणे, दिग्विजय शेरखाने आदींसह शिवसेना शाखाप्रमुख गटप्रमुख व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post