पाटण पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपण


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१८ जुलै) : आज पाटण पोलीस स्टेशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण निमित्ताने पोलीस ठाण्यात एक सभा आयोजीत करण्यात आली, त्या सभेमध्ये मुस्लिम बांधवांच्या 'ईद' सणानिमित्त परिसरात कायदा सुव्यवस्था सुरक्षित ठेवणे व कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करणे याकरिता बैठक घेण्यात आली. 
 यावेळी १० जुलै ला पिवरडोल येथील वाघाचा हल्ल्यात १८ वर्षीय तरुणाला वाघाने ठार केल्याची घटना घडली. यावेळी पिवरडोल शेत शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पिवरडोल गावाकऱ्यात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत, वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही. परिणामी ११ ते १२ जुलै पर्यत वनविभाग यांचे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू झाले होते. या दोन्ही घटनांनी पांढरवाणी, टाकळी व पिवरडोल गावामध्ये कायदा सुव्यवस्था भंग न होऊ देता प्रशासनास सेवा व सुरक्षित ठेवण्याकरिता उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून पोलीस पाटील ज्योती आत्राम पांढरवाणी, पोलीस पाटील दशरात बुरेवार टाकळी व पोलीस पाटील उत्तम भोयर पिरडोल यांचा आज पाटण पोलीस स्टेशन च्या वतीने येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संगीता हेलांडे व उपनिरीक्षक गणेश मोरे साहेब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघटना पाटण व मुस्लिम बांधवांची  उपस्थिती होती. हे विशेष..
पाटण पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपण पाटण पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपण Reviewed by सह्याद्री चौफेर on July 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.