सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (२८ जुलै) : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही पालवन चौकात राहत होती. ती दीप हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. सोनाली आणि बीडच्या एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय २७, रा. डोईफोडवाडी) याच्यासोबत प्रेमसंबंध जमले होते.
अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याने सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली. आधी लग्नाची बाब अक्षय याने टाळली. मात्र, सोनाली हिचा लग्नासाठी जास्तच रेटा वाढल्याने अक्षयने लग्नास नकार दिला. अक्षयने लग्नास नकार दिल्याच्या राग मनात धरून सोनाली जाधव हिने मांजरसुंभा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत सोनाजी जाधव हिचा भाऊ अजय जाधव याने अक्षय आव्हाड याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बीड : प्रेमप्रकरणातून नर्सची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2021
Rating:
