मुल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाच्या जयश्री वलकेवार व चंद्रपूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपाचे सुनिल जुमनाके विजयी
सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (९ जुलै) : कोरोना काळात मुल पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापती घनश्याम जुमनाके यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्या पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या जयश्री वलकेवार या अविरोध विजयी झाल्या आहेत तसेच चंद्रपूर पंचायत समितीच्या उपसभापतीची जागा घुग्गुस नगर पालिका झाल्यामुळे गोठविल्या गेली होती. त्यामुळे निरीक्षण तांड्रा यांच्या जागेवर चंद्रपूर पंचायत समिती उपसभापतीपदी भाजपाचे सुनिल जुमनाके विजयी झाले आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नेते रामपाल सिंह, भाजपाचे जिल्हा महासचिव नामदेव डाहूले, जिल्हा महासचिव संजय गजपुरे, चंद्रपूर पंचायत समितीच्या सभापती केमा रायपुरे, सदस्य संजय यादव, सिंधु लोनबले, चंद्रकांत धोडरे, विकास जुमनाके, वंदना पिंपळशेंडे, सविता कोवे, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, सदस्य पूजा डोहणे, वर्षा लोनबले, नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपा मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, आनंद पाटील ठिकरे, अमोल चुदरी, प्रशांत बांबोळे, दिलीप पाल, संजय येनूरकर, चंदू नामपल्लीवार, मुकेश जिल्हेवार, बंडू नर्मलवार, वंदनाताई आगरकाठे, जालींदर सातपुते, अमोल येलंकीवार यांनी जयश्री वलकेवार यांचे अभिनंदन केले आहे.
मुल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाच्या जयश्री वलकेवार व चंद्रपूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपाचे सुनिल जुमनाके विजयी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
