अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली रिक्त पदे भरण्याची दिली ग्वाही

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (९ जुलै) : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी प्राध्यापकांची पदेही रिक्त आहे. त्यामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. असे असले तरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यवतमाळ येथील अभियांत्रिकीय महाविद्यालयात एकच शिक्षक कार्यरत असल्याची गंभीर बाब उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या लक्षात आली. त्यानुसार भेट देवून आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयात तांत्रिकी कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहे, त्याचीही माहिती घेतली जाणार आहे. 



अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली रिक्त पदे भरण्याची दिली ग्वाही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली रिक्त पदे भरण्याची दिली ग्वाही Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.