शाळेची घंटा वाजली! मग वस्तीगृहाचे दरवाजे बंद का ? शिवसंग्राम व विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (९ जुलै) : शाळेची घंटा वाजली! मग वस्तीगृहाचे दरवाजे बंद का ? असा सवाल प्रशांत डोरले यांनी लावून धरला आहे. बीड जिल्ह्यासोबतच राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आलेली होते, बीड जिल्हयामध्ये ही सर्वच शाळा व महाविद्यालये अटी शर्तीसह बंद करण्यात आलेली होती.
महाविद्यालये बंद असल्याने सर्वच शासकीय वसतीगृह इमारत ही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोविड विलिगीकर सेंटर उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती.
या पार्श्वभूमीवर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ असलेले शासकीय मुलींचे वसतिगृह जिल्हा कारागृहातील आरोपी यांच्या विलीगिकरणासाठी ताब्यात घेण्यात आलेले होते, सध्या कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता तसेच येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षा पाहता तात्काळ वसतिगृह सुरु करावे. अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना शिवसंग्राम युवक आघाडी बीड शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांच्या समवेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले.
यावेळी शिवसंग्रामचे सूरज बहीर, अजय टिके, शीतल मेढ़े, सिरसट प्रांजल सिरसट, प्रीती गायकवाड, आकांक्षा रंधवे, निकिता खांडे सह अन्य युवक युवती उपास्थित होते.
शाळेची घंटा वाजली! मग वस्तीगृहाचे दरवाजे बंद का ? शिवसंग्राम व विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
