भारतीय जनता पार्टीचे चे विकासजी जुमनाके यांचा उपसभापती पदाच्या निडणुकित एकतर्फी विजयी


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
चंद्रपूर, (९ जुलै) : भारतीय जनता पार्टीचे विकासजी जुमनाके यांचा उपसभापती पदाच्या निवडणूकीत एकतर्फी विजय मिळवण्यात आला आहे. माजी अर्थ मंत्री आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी गृह राज्यमंत्री भारत सरकार मा.श्री.हंसराज भैय्या अहिर यांचे नेतृत्वात तसेच मा. श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे मार्गदर्शनात पंचायत समिती तालुका चंद्रपूरच्या भारतीय जनता पक्षाचे श्री. विकास जुमनाके यांची उपसभापती पदी एकमताने निवड झाली. दि.९ जुलै २०२१ ला पंचायत समिती तालुका चंद्रपूर उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती सभागृह चंद्रपूर येथे पार पडली.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सौ.खेमा रायपुरे, सभापती प.स.सौ.वंदना पिपलशेंडे, सौ.सविता कोवे, सौ.सिंधुताई लोनबले, श्री.चंद्रकांत धोंडरे, श्री.संजय जाधव, श्री.विकास जुमनाके या 7 सदस्यपैकी श्री.विकास जुमानाके यांचा उपसभापती पदाकरिता अर्ज दाखल करण्यात आला. या निवडणूकीत विरोधी पक्षाचे 2 सदस्य पकडुन एकूण 9 सदस्यांनी या निवडणुकीत भाग घेतला. त्यापैकी श्री.विकास जुमनाके यांना 7 मते विरोधी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 2 मते मिळून श्री.विकास जुमानाके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. सदस्य 

या निवडीबद्दल श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा, श्री. ब्रिजभूषण पाजारे चंद्रपूर शहर जिल्हा महामंत्री भाजपा, श्री.रामपाल सिह भाजप नेते,  सौ.रोशनी खान बाल कल्याण सभापती जि.प.चंद्रपूर, श्री.हनुमान काकडे तालुका अध्यक्ष भाजपा, श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यु.मो.चंद्रपूर, श्री.विजय आगरे तालुका महामंत्री, श्री.गौतम निमगडे जि.प. सदस्य, श्री.नामदेव आसुटकर, श्री.रणजित सोयाम जि.प. सदस्य, सौ.वनिता आसुटकर जि.प. सदस्य, श्री.सुभाष पिपलशेंडे, श्री.ऋषी कोवे, श्री.विनोद खेवले यांनी अभिनंदन केले.  
भारतीय जनता पार्टीचे चे विकासजी जुमनाके यांचा उपसभापती पदाच्या निडणुकित एकतर्फी विजयी भारतीय जनता पार्टीचे चे विकासजी जुमनाके यांचा उपसभापती पदाच्या निडणुकित एकतर्फी विजयी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.