सह्याद्री न्यूज | अमोल चिकने
महागांव, (१३ जुलै) : महागांव तालुक्यातील आंबोडा येथील एका रहिवाशी कुटुंबाच्या बोरवेल ला गेल्या चार दिवसापासून गरम पाणी येऊ लागल्याने चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार आंबोडा येथील रहिवाशी महादेव सुखदेव भोयर यांनी मागील चार वर्षापूर्वी घरगुती बोरवेल मारली होती, त्या बोरवेला आतापर्यंत पिण्यास योग्य पाणी येत होते. मात्र, आजपासून अक्षरशः अंघोळीला पाणी घालतं, त्याही पेक्षा गरम उकळते पाणी येत असल्याने गावाकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.
सुरुवातीला इलेक्ट्रिक मोटरचा परिणाम असावा म्हणून भोयर यांनी दुर्लक्ष केले. परंतु बोरवेल ला येणारे पाणी दिवासेंदिवस पाण्याचे तापमान वाढत च असल्याने महादेव भोयर हे भयभीत होऊन प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता, तलाठी अर्चना बोंबले व कोतवाल भगवान गरडे यांनी घटनास्थळ गाठले, व बोरवेल चा पावर चालू बंद करून पाहले असून बोरवेल मधून गरम पाणी येत असल्याने या धक्कादायक ठिकाणचा पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली अंदाजे ३०० फूट, परंतु मोटर पंप १५० फुटावर असल्याचे सांगितले. पुढे बोलतांना भोयर म्हणाले की, आजूबाजूच्या बोरवेल ला पाणी थंड आहे. परंतु माझ्याच बोरवेलला गरम पाणी आहे असे, प्रामाणिक जाहीर केले. त्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे.
दि. ११ जुलै रोजी भुकंपाचे केंद्र महागांव तालुक्यातील साधुनगर (मुडाणा) येथून असल्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदरील घटना ही संशोधनाचा विषय असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी भूगर्भशास्ञ अभ्यासकांना पाचारण करण्याची आवश्यकता ग्रामस्थांनी बोलून दाखविली व संबंधित घटनेचा उलगडा व्हावा अशी मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी हनवंतराव देशमुख, गजानन मिराशे व असंख्य गावकरी मंडळीसह विविध स्तरावरून मान्यवर उपस्थित होते.
'त्या' बोरिंग मधून येतंय गरम पाणी, नागरिकात भीतीचे वातावरण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 13, 2021
Rating:
