टॉप बातम्या

भरचौकात नालीचा मलबा टाकल्याने आरोग्य धोक्यात; अबब! नांदा ग्रामपंचायतीचा खरा प्रताप


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (१८ जुलै) : नांदाफाटा बाजारपेठेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला पाणी साचत असल्याने नांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या आदेशाने चक्क नालीचा मलबा गड्ड्यात टाकल्याने दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

अशावेळी मुरुम टाकण्याऐवजी नालीचा मलबा टाकल्याने उपसरपंचाच्या या प्रतापामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे येथील नागरिकांनी मलबा हटवून मुरूम टाकण्याची मागणी केली आहे. नांदाफाटा बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कडेला अल्ट्राटेक कंपनीतील जड वाहने थांबत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविणे अपेक्षित होते, या खड्ड्यांमध्ये नालीतून उपसा केलेला मलबा टाकल्याने मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, दुर्गंधीमध्येच नाईलाजाने येथील भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकावा लागत आहे.
नांदा ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरने उपसरपंचाच्या आदेशावरून नालीतील मलबा टाकल्याची माहिती मिळाली रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याऐवजी नालीतील मलबा टाकल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहेत येथील मलबा हटवून तातडीने मुरूम टाकण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहेत.
Previous Post Next Post