खाजगी शाळेची सक्तीची वसुली थांबवा- गुरुदेव युवा संघाची मागणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (९ जुलै) : शहरातील दारव्हा मार्गावरील एम. आय. डी. सी. भोयर परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून पालकांना फी भरण्यासाठी जबरी वसुली सुरू असून फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.

 स्कूल ऑफ स्कॉलर्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर व मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी मनोज गेडाम यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा ताई पवार यांच्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी गेडाम यांनी दिला आहे.

कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षी संपूर्ण भारतात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती, ह्या टाळेबंदी मुळे अनेकांचे आर्थिक चक्र थांबले, अशातच खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेतले, शाळेचा कालावधी संपताचं स्कूल ऑफ स्कॉलर्स या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने संपूर्ण फी भरा अन्यथा पुढील वर्षी प्रवेश मिळणार नाही असा तगादा लावणे सुरू केले आहे.

 या शाळेतील चव्हाण नामक मुख्याध्यापक तर शाळेत आलेल्या पालकांशी सुद्धा अरेरावी करत असल्याचा आरोप येथे शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. एकीकडे स्कूल ऑफ स्कॉलर शाळेने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे सुद्धा पालन करताना दिसत नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.
              (स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळा)

कोरोना महामारीमुळे आर्थिक चक्र खालावलेल्या एका पालकाने शाळेला मला माझ्या मुलीची टी.सी. द्या मी जिल्हा परिषदेच्या शाळेत माझ्या मुलीला शिकवितो असे सांगितल्यावर सुद्धा तुम्हाला पूर्ण फी भरल्याशिवाय टी.सी मिळणार नसल्याचे स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले. फक्त शाळेची फी न भरल्यामुळे ती विद्यार्थिनी पुढील शिक्षणासाठी वंचित राहत आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेचे मुख्याध्यापक यांचा मनमानी कारभार त्वरित थांबवा व शाळेवर कार्यवाही करा अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे.

 कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी मनोज गेडाम यांनी दिला आहे, फी न भरल्यामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवू नका अशी विनंती सुद्धा यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे.


खाजगी शाळेची सक्तीची वसुली थांबवा- गुरुदेव युवा संघाची मागणी खाजगी शाळेची सक्तीची वसुली थांबवा- गुरुदेव युवा संघाची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.