नांदा गावात डेंगुचा कहर ९ महीन्याची बालिका दगावली


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२० जुलै) : मागील महिन्याभरापासून नांदा नांदाफाटा परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यात दोन जणांचा नाहक बळी गेला, अनेक जण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत असल्याची माहिती आहे तर काही जणांची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे बोलले जात आहे.

 नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. डेंग्यूच्या साथीवर उपायोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने लोकप्रतिनिधींनी आता तरी त्यांना जाग आणण्याची गरज आहे. नांदा गावात मागील महिन्याभरापासून डेंग्यूची साथ असून दररोज पंधरा विस रुग्ण डेंग्यूने पॉझिटिव्ह येत असल्याची धक्कादायक माहिती आहेत. डेंगुमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून काही जणांची प्रकृती खालावली आहेत. नागरिकच काय येथील डाॅक्टरांना सुद्धा डेंगुची लागण झाली आहे.

स्थानिक जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी आरोग्य विभागाला नांदाफाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर लावून डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परंतु आरोग्य विभागाने अद्याप पावतो कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत यामुळे डास उत्पत्ती होत असून, मलेरिया सारखी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आयआयटी विद्यार्थ्यांचा मृत्यु व नऊ महिन्यांच्या बालिकेचा नाहक बळी यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. आतातरी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहेत.
नांदा गावात डेंगुचा कहर ९ महीन्याची बालिका दगावली नांदा गावात डेंगुचा कहर ९ महीन्याची बालिका दगावली Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.