राजूर कॉलरी दीक्षाभूमी येथे जी.प. सदस्य संघदीप भगत यांचा सत्कार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२० जुलै) : विकास कामांना नेहमी प्राधान्य देणारे व नागरिकांच्या समस्यांचे समाधान करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणारे जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांचा राजूर कॉलरी दीक्षाभूमी येथे हायमाक्स विद्युत दिवे लावून दिल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिक्षभूमी परिसरात अनुयायांना बसण्याकरिता लोखंडी खुर्च्याची व्यवस्था करून देण्याची मागणीही यावेळी त्यांच्याकडे करण्यात आली. संघदीप भगत यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना लवकरच दीक्षाभूमी परिसरात लोखंडी खुर्च्यांची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. संघदीप भगत यांनी राजूर वासियांना अनेक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी राजूरच्या विकासकामांकरिता आता पर्यंत ८० लाखांचा निधी खेचून आणला. आणखी ३० लाखांचा निधी आणण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरु असून लवकरच हा निधी आणून राजूरच्या विकासकामांना गती देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी राजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व तेथेच एका हॉलमध्ये जिमची व्यवस्था करून दिली. राजूर कॉलरी ते राजूर इजारा हा पक्का रस्ता जी.प. निधीतून त्यांनी पूर्ण केला. स्मशानभूमीमध्ये शेड बांधून दिले. महिलांना सक्षम करण्याकरिता १०० पेक्षा जास्त शिलाई मशीनचे त्यांनी वाटप केले. बचत गटातील महिलांना स्वरोजगाराकरिता मंडप डेकोरेशन साहित्य व भजन साहित्य उपलब्ध करून दिले. संघदीप भगत हे नागरिकांच्या नेहमी संपर्कात असतात. नागरिकांना आवश्यक त्या सेवा पुरविण्यास ते नेहमी तत्पर असतात. सामाजिक कार्यातही ते हिरीरीने सहभागी होतात. ते दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. तर आता ते जी.प. सदस्य म्हणून राजूरवासियांच्या सेवेत आहेत. विकास कामांकरिता निधी खेचून आणण्यात त्यांचा हतकंडा राहिला आहे. जी.प. च्या निधीतून राजूर येथे पक्के रस्ते बांधले गेले. गावाचा सर्वांगीण विकास व जनतेच्या समस्यांचे निराकरण हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. नागरिकांना आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहणार असल्याचे मनोगत त्यांनी या छोटेखानी सत्कार सोहळ्यातून व्यक्त केले.
राजूर कॉलरी दीक्षाभूमी येथे जी.प. सदस्य संघदीप भगत यांचा सत्कार राजूर कॉलरी दीक्षाभूमी येथे जी.प. सदस्य संघदीप भगत यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.