धक्कादायक! जादूटोणा संशयावरून एकाला केली मारहाण, पीडितने दिली पोलिसात तक्रार


                       (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२० जुलै: मारेगाव तालुक्यातील केगांव येथे जादूटोणा च्या संशयावरून गावातीलच तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
गावातील मंदिरातून पूजा करून घरी परतताना वाटेत धक्काबुक्की करून पायघन यांना मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार आज २० जुलै रोजी  मारेगाव तालुक्यातील केगांव येथे सकाळी ९ च्या दरम्यान घडला असून, पीडित पांडुरंग महादेव पायघन (६४) यांच्या तक्रारी वरून आतिष गणपत ठावरी (२७), शिला आतिष ठावरी (२५), गीता गणपत ठावरी (५०) यांच्या विरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली.

जादूटोणा संशयावरून मारहाण केल्याने आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
धक्कादायक! जादूटोणा संशयावरून एकाला केली मारहाण, पीडितने दिली पोलिसात तक्रार धक्कादायक! जादूटोणा संशयावरून एकाला केली  मारहाण, पीडितने दिली पोलिसात तक्रार Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.