सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (१८ जुलै) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे जुन्या भांडणातून एका तरुणावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना १६ जुलै ला शुक्रवारी भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गालगत घडली. वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता च्या सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता, या ठिकाणी दोन तरुण मोटार सायकल वरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत एकाने पिस्तुल काढली. काही कळायच्या आत पिस्तुल गावडे यांच्या पाठीला लावत त्याने गोळी झाडली. मात्र, गावडे यांनी मोठ्या हिम्मतीने सतर्कता दाखवत त्याच्या हाताला झटका दिला. यामुळे गोळी डोक्याला चाटून गेली आणि पुढील अनर्थ टळला. यानंतर मारेकरी तेथून फरार झाले.
हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार रा. सावरगाव या दोघांविरोधात शुक्रवार रोजी रात्री उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी फरार असून, या प्रकरणी पुढील तपास सपोनि संदिप काळे हे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार, फरार आरोपीना शोधताय पोलीस प्रशासन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2021
Rating:
