सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१८ जुलै) : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलीय. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येथील मनोहारी दृश्य पाहण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी दरवर्षी उसळते.शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या जलधारांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आज पर्यटकांनी इथे गर्दी केलीय. यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे १२५ कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर 'इस्लापूर पाटी' पासून ५ कि.मी तर किनवटपासून ५० कि.मी. अंतरावर आहे.
नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधब्या वर पर्यटकांची गर्दी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2021
Rating:
