आगामी 'जिगरा' मराठी चित्रपटाचे सिने अभिनेता माजिद खान यांनी नाकारले मानधन - गोरे


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मुंबई, (२१ जुलै) : आगामी नविन मराठी चित्रपट जिगरा 'एक प्रेम कथा' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरणास १ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून शुटिंग ला सुरूवात होत असून, 'जिगरा' या मराठी चित्रपटसाठी सिने अभिनेते  माजिद खान यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष उल्लेखनीय की, निर्माता व दिग्दर्शक यांनी चित्रपटासाठी देऊ घातलेले मानधन नुकतेच नाकारल्याने सर्व स्तराहून त्यांचे कौतुक होत आहे.

दिग्दर्शक पांडूरंग गोरे पुढे म्हणाले की, जिगरा हा मराठी चित्रपट लॉकडाऊनच्या काळात रखडला होता, यात प्रमूख खलनायकाची भुमिका करणारे कलाकारांनी 'पैसे  नाही तर आम्ही येणार नाही' असे आडून पाहिले, मात्र आता जिगरा या मराठी चित्रपटाचे शुटिंग सुरु होत असून, दिग्दर्शक पांडूरंग गोरे यांना एक जबरी खलनायक साठी नावाजलेल्या कलाकाराची गरज होती, त्यासाठी सिने अभिनेता माजिद खान यांना प्रमुख भुमिकेसाठी विचारानां केली. व जिगरा या मराठी चित्रपटा चे बजेट खुप कमी असल्याचे लक्षात घेऊन चित्रपटासाठी एक ही रुपायांचे मानधन न घेता, माजिद यांनी काम करण्यास होकार दिला. तुमचे मानधन आम्हास परवडणार नाही. असे सांगितले असता अभिनेते माजिद खान यांनी जिगरा यात मानधन न घेता भूमिका स्विकारली. सध्या ते विविध चित्रपटामधे व्यस्त असतात तरी ही मी काम करणार असे माजिद यांनी 'सह्याद्री ई न्यूज' ला बोलतांना म्हणाले.

दिग्दर्शक पांडूरंग गोरे यांचा 'जिगरा' चित्रपट पूर्ण करून रिलीज करण्याचे स्वप्न माजिद खान यांच्या मुळे आता पूर्ण होणार आहे. माजिद खान यांची सर्व साधारण  निर्माता व दिग्दर्शकसाठी दरिया दिली ची भावना, या मुळे 'जिगरा' मराठी चित्रपट चे दिग्दर्शक पांडूरंग गोरे हे भारावून गेले, छोट्या दिग्दर्शकासाठी अभिनेते माजिद खान नेहमी मद्दतीचां एक हात पुठे करीत असतात.

तसेच आखिल भारतीय चित्रपट महामंडळ चे भरारी पथक मध्ये माजिद खान यांनी चांगली कामगीरी केली आसून, ग्रामीण भागातील कलाकार व दिग्दर्शकासाठी तळमळ माजिद यांचा मध्ये दिसून येते, दिग्दर्शक पांडूरंग गोरे व टीमने मोठ्या मनाने माजिद खान यांचे आभार मानले.
आगामी 'जिगरा' मराठी चित्रपटाचे सिने अभिनेता माजिद खान यांनी नाकारले मानधन - गोरे आगामी 'जिगरा' मराठी चित्रपटाचे सिने अभिनेता माजिद खान यांनी नाकारले मानधन - गोरे Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.