ग्राहकाचा मीटर पळविणाऱ्या लाईनमन वासेकर व ठाकरे यांचे वर कार्यवाही करा - सामाजिक कार्यकर्ते घनश्याम मेश्राम यांची मागणी
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजुरा, (३० जुलै) : बामणवाडा तह. राजुरा येथील श्री. सुभाष टेकाम, मजुरी करून कुटुंब चालवीत असताना यांनी नवीन मीटर साठी दिनांक २४/४/२०२१ ला चार महिन्यापूर्वी राजुरा येथील वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यानंतर रीतसर दिनांक ८/५/२०२१ ला डिमांड चा भरणा श्री. टेकाम यांनी केला. चार महिने लोटूनही मीटर आले नाही म्हणून तब्बल पाच दिवस राजुरा विद्युत विभागाच्या चकरा मारून मीटर आल्याची खात्री करवून घेतली. तेथील कर्मचाऱ्याने तुझा मीटर ठाकरे लाईनमन कडे पाठविला असून, लावून देईल असे सांगितल्याने सुभाष आनंदित झाले. मात्र, मीटर पाठवून दहा दिवस लोटले असताना लाईनमन ठाकरे कडून मीटर लावण्यात आला नाही. ठाकरे यांचे सोबत संपर्क साधले असता वासेकर लाईनमन ला मीटर लावण्यासाठी सांगितले आहे. असे सांगितले असून टोलवाटोलवी ची उत्तर देत आहेत, वासेकर लाईनमन यांनी दहा दिवसांपासून मीटर लावून दिले नाही. यामुळे विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
चार महिन्याचा कालावधी लोटला असताना लाईनमन ठाकरे यांनी सुद्धा दहा दिवसांपासून मीटर दडवून ठेवला आहे. यामुळे सुभाष टेकाम यांच्या कुटुंबियांना अंधारात राहावे लागत असून लहान मुलांना त्रास होत आहे.
लाईनमन ठाकरे हे सुभाष टेकाम यांचा मीटर इतर व्यक्तीला लावून दिलं की काय? अशी शंका निर्माण होत आहे. या अगोदरही असे अनेक प्रकार घडलेले असून शक्यता नाकारता येत नाही असे मत सुभाष टेकाम यांनी व्यक्त केले असून, माझा मीटर मला माझे घरी न लावून दिल्यास कार्यालयात ठीया मांडणार असा संकल्प टेकाम यांनी केला आहे.
सुभाष टेकाम यांचा मीटर तत्काळ लावून द्यावा व मीटर दडवून ठेवणारे वासेकर व ठाकरे लाईनमन वर कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम यांनी केली आहे.
ग्राहकाचा मीटर पळविणाऱ्या लाईनमन वासेकर व ठाकरे यांचे वर कार्यवाही करा - सामाजिक कार्यकर्ते घनश्याम मेश्राम यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2021
Rating:
