बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (२९ जुलै) : आरोपी लोकसेवक श्री रमेश लक्ष्मण पसलवाड, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी तालुका कृषी अधिकारी, बिलोली यांनी दिनांक ७-०७-२०२१ रोजी तक्रारदार यांच्या कडे 9,000 हाजाराची रुपयेची लाचमागणी केली. लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी दिनांक १६-०६-२०२१ रोजी पडताळणी केली. तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पडताळणीच्या कामासाठी वेळ वाढल्याने 15,000/- रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती 12,000/- रु.मिळवण्याचा प्रयत्न केला.

यातील आरोपी लोकसेवक रमेश लक्ष्मण पसलवाड यांनी तक्रारदार यांचे नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी शेती उपयोगी खत, बियाणे,औषधे विक्रीचे परवान्यांचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पाठवण्यासाठी 15,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती 12,000/ रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला.

सदरील सापळा मा. श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड, पोलीस उप अध्यक्षक मा. विजय डोंगरे, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद हिगोले, पोना गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी कार्यवाही पार पाडली आहे.

तरी सर्व नागरिक आवाहन करण्यात येथे की शासकीय अधिकारी कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचेच्या मागणीचे फोन ,मॅसेज, विडीओ, आडीओ क्लिफ असल्यास किंवा शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी माहिती अधिकारात शासकीय निधीचा भ्रष्टाचार झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधा असे आवाहन केले आहे.


बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड एसीबीच्या जाळ्यात बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड एसीबीच्या जाळ्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on July 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.