टॉप बातम्या

भेंडवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
चंद्रपूर, (२३ जुलै) : जिवती तालुक्यातील पाटण ते गडचांदुर या मार्गावरील भेंडवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच दुसरीकडे पाटण कोलांडी मार्गावरील पुलाचे बांधकाम दोन महिन्यापासून कासवाच्या गतीने सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक जण या ठिकाणी अडकून पडले आहे.

सततच्य पावसामुळे पुलाच्या कडेला येण्या-जाण्यासाठी तयार केलेले मार्ग ते सुद्धा वाहून गेले आहे. त्यामुळे पाटण-कोलंडी मार्ग हा बंद पडलेला आहे. या दरम्यान,  जिवती तालुक्यात बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे आदिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांना या पावसामुळे कापूस, सोयाबीन,  तुर पिकांची नुकसान झाली आहेत. 

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

तालुक्यात मुसळधार पाणी आल्यानंतर आदिचे शेत खरवडून टाकले असून, विविध शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. लोट असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय मदत मिळेल काय! अशीच आशावाद शेतकरी धरून आहे. जिवती आणि कोरपना तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतात 
खड्डे पडून या मुसळधार पावसाने मोठी शेतीची 
हानी झाली असून नुकसान झाले आहे. करीता प्रशासकीय आधिकारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकरी यांनी केली आहे.
Previous Post Next Post