भूकंप अपडेट्स : जिल्ह्यात याभागात भूकंपाचे सौम्य धक्के

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (११ ) : भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सकाळी भूकंपाचा पहिला सौम्य धक्का ८ बाजून ३३ मिनिटाला तर दुसरा ८ वाजून ४९ मिनिटाला जाणवला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ह्या भूकंपाचे मुख्य केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत येणाऱ्या साधूनगर (मुडाणा) असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. भूकंपाची तीव्रता ४.४ रिस्टर स्केल तीव्रता केंद्रात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून भूकंपाच्या केंद्राची माहिती मिळताच साधूनगर येथे एस डी ओ. स्वप्नील कापडणीस, तहसीलदार नामदेव इसळकर, तलाठी ललीत इंगोले,आणि पो .पा .दिलीप खराटे, साधुनगर येथील पो .पा. गजानन राठोड , यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. साधुनगर आणि मुडाणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले नसून कुठेही नुकसान झाले नाही.घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा ताबडतोब होता .

नागरिकांनी कृपया स्वतःची काळजी घ्यावी कृपया घरांमध्ये कोणीही थांबवू नये भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
भूकंप अपडेट्स : जिल्ह्यात याभागात भूकंपाचे सौम्य धक्के भूकंप अपडेट्स : जिल्ह्यात याभागात भूकंपाचे सौम्य धक्के Reviewed by सह्याद्री चौफेर on July 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.