बीड जिल्ह्याचे लाडके तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या केलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे
बीड, (११ जुलै) : मागील दोन वर्षापासुन देशांमध्ये कोरोना महामारी चे संकट आहे. या दरम्यान पहिल्या लाटेतील बीड जिल्ह्यातील कोरोना महामारी च्या संकटावर मात करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी अत्यंत उत्कृष्ट उत्तमरित्या नियोजन केले होते, या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेण्यात आली आहे.
न्यूयार्क येथील कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अंड पब्लिक अफेअ सर्च च्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय झाला आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीची लागण होण्यास सुरुवात झाली होती, याचे चोख नियोजन करण्याचे काम बीड जिल्ह्याचे लाडके तत्कालीन पोलीस अधिक्षक मा.श्री. हर्ष पोद्दार यांनी आपल्या उत्कृष्ट कुशल बुद्धिमत्तेने अतिशय चांगले कार्य केले होते. विशेष उल्लेखनीय की, बीड जिल्ह्यातून ऊस तोडणी साठी गेलेले ७० हजार ऊसतोड कामगार एप्रिल-मे मध्ये परतले. या मजुरांच्या माध्यमातून कोरोना चा फैलाव होऊ नये, यासाठी सहा जिल्ह्याच्या भिडणाऱ्या सीमा वर तीनशेहून अधिक आंतर जिल्हा रस्ते शोधून ते सील करण्यात आले होते. जागोजागी परतणाऱ्या ऊस तोड कामगारांसाठी तालुका स्तरावर ऊसतोड मजुरांच्या राहण्या जेवणाची व्यवस्थाही उत्कृष्टपणे केली होती.
सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना याबाबतच्या नियोजनाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, कॉन्टेन्ट कॅन्ट ट्रे सिंग मार्फत ३५० जणांना कोरोना चाचण्या करून त्यांना काही दिवसासाठी एका ठिकाणी बाजूला ठेवले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये अडकलेल्या कुटुंबासाठी क्यूआर कोड (QR) युक्त पास तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलिसांचा चमु २४ तास सेवा पुरवली जात होती, त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली गेली आहे.
जगातील एक सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक हे असलेले 'कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफे' सर च्या माध्यमातून आता हा विषय अभ्यासासाठी घेण्यात येत आहे. सध्या बीड जिल्ह्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले मा.श्री.हर्ष पोद्दार हे आता जिल्हा अमरावती या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी आपले कार्यरत आहेत.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली असल्याने आता परत बीड जिल्ह्याला खरोखरच हर्ष पोद्दार यांची गरज आहे. असा जिल्ह्यातून एकमताने सुरु उमटत आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तमाम जनतेमधून पोद्दार साहेबांच्या कार्याचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच हर्ष पोद्दार साहेब हे परत बीडला विराजमान व्हावे अशा प्रकारचे साकडे ही बीड जिल्ह्यातील जनता आता पोद्दार साहेबांसाठी ईश्वराकडे मागणी घालत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.
बीड जिल्ह्याचे लाडके तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या केलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 11, 2021
Rating:
