कोलगाव येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (२० जुलै) : काल तालुक्यातील कोलगाव येथील विज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना येथीलच एका शेतकऱ्याची विष प्राशन केल्याने मृत्यू झाला आहे.
 
याबाबत असे की, १५ जुलै रोजी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली होती, सुनिल आनंदराव गारघाटे रा. कोलगाव असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन, त्यांना उपचारासाठी सुगम हॉस्पिटल येथे १५ जुलै रोजी दाखल करून त्यांचेवर उपचार सुरू असतांना आज उपचारादरम्यान  सकाळी ८ वाजतच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे काल आणि आज च्या निधनाने गावात हळहळ होत आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून, मारेगाव तालुक्यात सन २०२० मध्ये ७३ तर २०२१ मध्ये ४३, आज दिनांक १९ जुलै पर्यंत आत्महत्या झाल्या आहे. त्यात सतत आत्महत्या ची भर पडतच असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं व शेतकऱ्यांत जनजागृती करणे हे अतिशय आवश्यक झाले आहे.

या दरम्यान, गारघाटे यांच्या आत्महत्ये नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांच्या पाठीमागे पत्नी, व दोन मुली असा आप्त परिवार आहे. 
कोलगाव येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू कोलगाव येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू  Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.