गवारा येथील घरात शिरले पाणी : संजय आत्राम यांनी नाली दुरुस्त करण्याची केली मागणी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (११ जुलै) : झरी जामणी वरून सात किमी अंतरावर तसेच पिवरडोल जवळ असलेले गवारा येथे काल दि.१० जुलै रोजी खूप पाऊस झाला. 
त्या पावसात चक्क! काही लोकांच्या घरात पाणी शिरले असे येथील सामाजिक कार्यकर्ते व बिरसा मुंडा अध्यक्ष समिती संजय आत्राम यांनी नुकतेच सांगितले.

आत्राम पुढे सांगताना म्हणाले की, गवारा गावात काल मोठया प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे पाणी जाण्यासाठी नाली ची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे हे नैसर्गिक पाणी निलेश भोयर, सुनील भोयर व सुरेखा आत्राम यांच्या घरात घुसले. साधारणतः रात्री दहाच्या सुमारास हे पावसाचे पाणी घरात शिरले असे ते म्हणाले.

यामुळे गवारा गट ग्रामपंचायत चा हलगर्जी पणा चहाट्यावर आला आहे. आत्राम यांनी सदर गट ग्रामपंचायत यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

पावसाळ्याचे दिवस असून ग्रामपंचायत गावातील समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी 'सह्याद्री ई न्यूज' ला बोलून दाखवले आहे.

सध्या पावसाळा सुरु झाला परंतु पाण्याला फारसा जोर नसल्याने आताही गावातील नाली व ग्राम स्वच्छता होऊ शकते जर ग्रामपंचायत ने लक्ष घातले तर मात्र, असे होत नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसरी लाट कधी धडकेल हे सांगता येत नाही. परिणामी आरोग्याच्या दृष्टीने गावातील नाल्या दुरुस्त करणे अतिशय गरजेचे आहे. असे सामाजिक व बिरसा मुंडा समिती अध्यक्ष संजय आत्राम यांनी सांगितले. 
गवारा येथील घरात शिरले पाणी : संजय आत्राम यांनी नाली दुरुस्त करण्याची केली मागणी गवारा येथील घरात शिरले पाणी : संजय आत्राम यांनी नाली दुरुस्त करण्याची केली मागणी  Reviewed by सह्याद्री चौफेर on July 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.