आपटी येथे मनसेचा भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मार्डी, (११ जुलै) : मारेगाव तालुक्यातील आपटी येथील उपसरपंच हनुमान बावणे यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांना राजसाहेबांच्या विचारा खाली एकत्र आणत मनसे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विभाग प्रमुख रोशन शिंदे यांनी दिनांक १० जुलै रोजी भव्यदिव्य 'पक्ष प्रवेश सोहळा' आयोजित केला होता. या पक्ष सोहळ्यात सत्तर च्या वर अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश घेतला आहे. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ रोगे, लाभेश खाडे, रुपेश ढोके, चांद बहादे, संजय आसमवर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष यांनी सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपटी येथे मनसेचा भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न आपटी येथे मनसेचा भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on July 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.