कोविड-१९ उपाययोजना करीता वितरित निधीची अफरातफर,राजुरा आरोग्य केंद्रातील प्रकार - संतोष कुळमेथे यांनी सीईओकडे केली चौकशीची मागणी
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजुरा, (२८ जुलै) : कोविड - १९ या आजारावर उपाययोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे वितरित करण्यात आला या निधीतून खरेदी केलेली औषध व साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याने त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्याकडे केली आहे.
माहे मार्च-एप्रिल २०२० मध्ये कोविड - १९ या आजारावर उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपायाकरिता राजुरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंBBद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे औषधी, साधनसामग्री,साहित्य खरेदी करण्यासाठी तिनही आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक लाख रुपये या प्रमाणे जिल्हा परिषद मधून निधी वितरित करण्यात आला या वितरित निधीतून निकृष्ट दर्जाची साहित्य खरेदी करून निधीची अफरातफर केल्याचा आरोप कुळमेथे यांनी केला आहे.
माहे मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेली औषधे, साधनसामग्री,साहित्य, व्हाउचर, बिल वितरकाचे नाव,खर्चित रक्कम आणि खतावलेल्या जमावही (stock book) आदींची काटेकोरपणे तपासणी केल्यास भोंगळ कारभाराची सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तुळात वर्तविली जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याची संपूर्ण कागदोपत्री असलेल्या नोंदीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी संतोष कुळमेथे यांनी केली आहे यावर जिल्हा परिषद कार्यालयाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
"कोविड-१९ या आजारावर उपाय योजना करण्यासाठी राजुरा तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला जो निधी वितरण करण्यात आला त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची निःपक्षपाती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही माझी मागणी आहे".
कोविड-१९ उपाययोजना करीता वितरित निधीची अफरातफर,राजुरा आरोग्य केंद्रातील प्रकार - संतोष कुळमेथे यांनी सीईओकडे केली चौकशीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2021
Rating:
