कोकण पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वणीकरांना केले मदतीचे आवाहन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२७ जुलै) : कोरोना महामारी नंतर आता महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. सगळीकडे आहाकार माजला आहे. पुरामध्ये कोकणात जवळ जवळ सर्वच घरातील सर्व साहित्य वाहून गेले.

पूरग्रस्तांची जगावं की मरावं अशी अवस्था झाली. अशावेळी पूरग्रस्तांना आपल्या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून जमेल तेवढी मदत करा. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे राज्य उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर यांनी तालुक्यासह वणीकरांना करण्यात येत आहे.

मदतीचे स्वरूप : पिण्याचे पाणी, अन्नधान्य, खाद्यपदार्थ, औषधे, सॅनिटरी नॅपकिन सॅनिटायजर, मास्क व इतर गृहपयोगी वस्तू देण्यात यावे.

मदत जमा करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा, ९६६५१११९३३, ९०४९३४३९९९, ९८२२०९७१५४, ७३५०५०३४१९ तसेच मनसे रुग्ण सेवा केंद्र वणी जिल्हा यवतमाळ येथे ही आपली मदत जमा करू शकता. 
        

कोकण पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वणीकरांना केले मदतीचे आवाहन कोकण पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वणीकरांना केले मदतीचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.