सह्याद्री न्यूज : विवेक तोडासे
मारेगाव, (२७ जुलै) : राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक बाबतीत लढणारी एकमेव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा ५९ वा वर्धापन दिन मारेगाव पंचायत समिती च्या प्रांगणात गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, गट शिक्षण अधिकारी शेख लुकमान, प्रभारी विस्तार अधिकारी शिक्षण प्रदीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी सल्लागार विठ्ठलराव ठावरी, कार्याध्यक्ष माणिक नाईक, अशोक चटप, बाबाराव ढवस, सीताराम मारबते, पुरुषोत्तम हलगरे, हिरामण आगे, हरेश होटे, संदीप गोहोकार, विजय झाडे, सचिव रणजित ठावरी, विपीन मुस्कावार, विनोद ढोणे, साधनव्यक्ती निलेश आत्राम, सेवकदास नरांजे, व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक समितीचा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2021
Rating:
