सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (३ जुलै) : चोरटे कोणत्या वस्तूंची कधी चोरी करतील याचा काही नेम नाही. त्यात व्यसनाधिनता किंवा जुना वाद असल्यास मग चोरटे कोणत्याही थराला जाण्याची जातात. अशाच कांहीसा प्रकार समोर आला आहे.
चोरट्यांनी एका वादामुळे मारेगाव येथील ए वाय देशी दारूचे दुकान फोडून १ लाख ३० हजार रुपये काढून चोरून नेले असल्याची तक्रार १ जुलै रोजी संतोष मनोहरलाल जयस्वाल रा. चिखलगाव ता.वणी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षरा बारच्या पाठीमागे असलेल्या सौ. आरती योगेश जयस्वाल यवतमाळ यांच्या मालकीचे ए वाय देशी विक्रीचे दुकान आहे. नौकर सांयकाळी दुकान बंद करून घरी गेले असता, सकाळी दुकान उघडण्यासाठी संतोष जयस्वाल आले असता दुकान चोरट्यांनी फोडले असल्याने दुकानातील १ लाख ३० हजार रूपयेची चोरी झाल्याचे दिसून आले.
संतोष जयस्वाल रा. चिखलगाव ता. वणी यांच्या तक्रारी नुसार अज्ञात इसमावर कलम ३८०/४५७/४६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास करित आहे.