सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (३ जुलै) : वाढत्या महागाईच्या मुद्यावर आज केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत सिलिंडरची तिरडी बांधून अंत्ययात्रा काढली.
महागाईचा निषेध म्हणून सिलेंडरची तिरडी बांधून अंत्ययात्रा आंदोलन केले. यावेळी जिल्हाभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.