टॉप बातम्या

नागपूर-तुळजापूर महामार्गावर आर्णी जवळ 'बस-ट्रक' ची आमने सामने टक्कर


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (३ जुलै) : दारव्हा येथून आर्णी करीता निघालेल्या एसटी बस ला जवळा येथे समोरून भरधाव येणाऱ्या आयशर ट्रक ने जबर धडक दिली. ज्यामध्ये बस चा चकणाचूर झाला असून तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी १० वाजता घडली.

दरम्यान, बसमध्ये १७ प्रवाशी असल्याचे माहिती मिळाली. त्यापैकी ड्राइवर व ३ प्रवाशी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. या गंभीर अपघातात बस चा उजवा भाग पूर्णपणे चेंदा मेंदा झाला. 
परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.
सदर बस फोर लाईन वर रॉंग साईडला जात असल्याने अपघात झाला असल्याचे चर्चा आहे.
पुढील तपास आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांची टीम करीत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();