सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (३१ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन माननीय आमदार गणपतराव देशमुख हे अफलातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व होते. सलग सलग अकरा वेळा आमदार होणे तेही जनतेच्या विश्वासाने जनतेच्या मनाने आणि कुठलेही प्रलोभनं न देता,अकरा वेळा आमदार होणे ही एक अद्वितीय आणि न पटणारी अशी गोष्ट असली तरी, हे खरे आहे.माननीय आमदार गणपतराव देशमुख उर्फ आभार हे सांगोला सांगोला तालुक्याचे करत होते. ते धनगर समाजाचे एक अत्यंत विश्वासू साधे मनमिळावू आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं असं नेतृत्व होतं असे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले देशाची तसेच राज्याची मोठी हानी झालीआबा ना भावपूर्ण श्रद्धांजली बाबाच्या जाण्याने एकच शतकातील कायम लोकप्रतिनिधी व करून शासनाला आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रभावित करणारे व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नागपूर असो या मुंबई असो अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करणारे व्यक्तिमत्व असे नेते दुर्मिळच कुठले भ्रष्टाचाराचे ठपका न ठेवता जीवन जगणारे तसेच शुद्ध चारित्र्याचे व्यक्तिमत्व निरोगी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.(आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख बसने प्रवास करताना)
असे नेते होणे नाही जीवनामध्ये अकरा वेळा आमदार होताना कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाची ध्येयधोरणे राबवणे कुठल्याही पक्षाने प्रलोभने दिले तरी पक्ष बदलला नाही प्रलोभनाला बळी पडले नाही. तहहयात एकाच पक्षांमध्ये राहून जनतेची सेवा केली असे व्यक्तिमत्व आज आपण हरवून बसलो याचे मोठे दुःख होत आहे. आबा आपण देशामध्ये एक आदर्श निर्माण केला की, पैसा पद हे काहीच नसते तर जनता ही सर्वस्व असते जनतेसाठी कामे करणे हेच महत्त्वाचे याच्याच जोरावर अकरा वेळा जवळ जवळ अस पंचावन्न वर्षे आमदार म्हणून काम केले.
देशाचे नेते आदरणीय शरदराव पवार यांचे विश्वासू आणि एक मित्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी त्यांना मंत्रिपदी ही आमंत्रित केले होते, सन्मान माननीय पवार साहेबांनी केला. अनेक वेळा अनेक मोठी पदे देण्याचे प्रलोभन दाखवून सुद्धा बाबांनी पक्ष सोडला नाही.
आजच्या काळात असे दैवी जनतेची सेवा करणारे जनतेवर विश्वास ठेवणारे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारे नेते दुर्मिळच अशी एक स्वच्छ कारभाराचे जनतेच्या मनातील राजा आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 31, 2021
Rating:
