सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (०१ ऑगस्ट) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एम आय एम पक्षाचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते शेख सलीम हे सुरवाती पासुन एम आय एम पक्षात कार्य करीत असुन पक्ष वाढविणे,एम आय एम पार्टीचे उद्देश व ध्येय पुर्ण करण्याकरीता तसेच समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्या करीता सदैव प्रामाणिक व निस्वार्थ पणे कार्य करीत असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने एम आय एम कळंब शहर अध्यक्ष पदी निवड करून यवतमाळ येथील दि. २८ जूलै बुधवारी रोजी विश्राम गृह येथे झालेल्या एका सभे मध्ये डॉ. गफार कादरी औरंगाबाद एम आय एम महाराष्ट्र प्रमुख, जनरल सेक्रेटरी फिरोज लाला नांदेड यांच्या उपस्थितीत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
यावेळी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी चांद मोहम्मद शेख वसीम शेर खान, कृष्णा जाधव पुसद अन्य पद अधिकारी उपस्थित होते .
पक्षाने माझ्या वर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही तसेच समाजातील उपेक्षीत घटकाला न्याय देण्या करीता व पक्षाचे ध्येय, धोरण ची योग्यरित्या अमलबजावणी करण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया एम आय एम चे नवनिर्वाचित कळंब शहर अध्यक्ष शेख सलीम यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख याच्या कडे व्यक्त केली .
शेख सलीम यांची निवड झाल्या मुळे समाजित समस्याचे निवारण नक्कीच होईल अशी शहरात चर्चा आहे .
एम आय एम कळंब शहर अध्यक्ष पदी शेख सलीम यांची नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख, जिल्हा संयोजक शाहरुख काजी, कळंब तालुका संयोजक अनवर अली ,कळंब शहरातील युवक शेख वसीम, उस्मान भाई, रफिक भाई तसेच मित्र मंडळींनी अभिनंदन व्यक्त केले.
(एम. आय. एम.) कळंब शहर अध्यक्ष पदी शेख सलीम यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2021
Rating:
