देगलूर,बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भेटी गाटींना सुरुवात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : केसराळी तालुका बिलोली येथे देगलूर/बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी अपरजिल्हा अधिकारी मा. बी.एम.कांबळे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा तसेच हितगुज झाले. ग्रामस्थांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी एक मोकळा संवाद झाला, या भेटी दरम्यान देगलूर-बिलोली  पोटनिवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा आणि ग्रामस्थांनी स्वतःची मत व्यक्त केली. या संवाद दरम्यान ग्रामस्थांचे मिळालेले आशीर्वाद नेहमी बळ देतील.

यावेळी माडे दत्तात्रय पाटील (माजी सरपंच), सुभाष पाटील काळे, सटवाजी सोनकांबळे (माजी सरपंच), 
प्रकाश फकीरे (त्रिरत्न बौद्ध विहार ट्रस्ट अध्यक्ष), रानबाजी इरबा सोनकांबळे, हनमंत टमटम, मोगलाजी फकीरे, नितीन कारले, राजेश्वर मंदरणे (सरपंच प्रतिनिधी), मादळे मारुती (उपसरपंच), विनोद मोगलाजी फकीरे‌ तसेच केसराळी गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
देगलूर,बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भेटी गाटींना सुरुवात देगलूर,बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भेटी गाटींना सुरुवात Reviewed by सह्याद्री चौफेर on July 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.